STORYMIRROR

Sangamsingh Shivaji Kadam

Classics Inspirational

4  

Sangamsingh Shivaji Kadam

Classics Inspirational

छाटले जरी पंख माझे

छाटले जरी पंख माझे

1 min
852

छाटले जरी पंख माझे

उडणार मी जरूर आहे

उत्तुंग भरारी घेण्याची

जिद्द माझ्या रक्तात का उगाच आहे?

 

जाहले गलीतगात्र, मूर्च्छितमात्र

छिन्न विछिन्न तन परि

राखेतूनही पेटून उठणारा

धगधगता निखारा का मी उगाच आहे?

 

सापडे ना वाट जरी

गडद अशा या तिमिर राती

किर्रर्र काळोख सुरंगी अंती

पेटलेली मशाल का मी उगाच आहे?

 

ठाकले कित्येक जरी मेरू गिरी

जरी धिप्पाड हिमालय संकटांचे

उष्ण सावळा कातळ मावळा

सह्याद्री का मी मग उगाच आहे?



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics