अजूनही कानात माझ्या..
अजूनही कानात माझ्या..
अजूनही कानात माझ्या गुंजताहेत वंदे मातरमचे नारे
हसत हसत अन् चढत होते फासावरती सारे
त्यागला होता संसार
देशच होता प्राण
त्यागले होते तारुण्य
मिळविण्या स्वातंत्र्य
अजूनही आठवताहेत मला ते रस्ते
सांडले होते त्यांच्यावर रक्तच रक्त नुसते
पडले होते देहही
पडले होते इरादे
मात्र आवाज होता कानी
विसरू नका रे वादे
अजूनही आठवताहेत मला ते डोळे
ओकत होते फक्त आगीचे गोळे
हृदय नव्हतेच ते
झाले होते दगड
पाहत होते वाट
तुडविण्या फिरंगी रग्गड
आज तेच आहेत रस्ते, तेच आहेत डोळे
वाट बघताहेत अजून एका उठावाची
मग लागतील तसेच नारे
पुन्हा उठतील पेटूनी सारे
हाती घेउनी मशाली
लढण्या अमानवतेविरुद्ध!!!
