छान पिवळा सोनुला
छान पिवळा सोनुला
ग्रीष्म ऋतूत फुलतो
देतो मनाला ओलावा |
छान पिवळा सोनुला
मन मोहतो बहावा ||१||
कर्णफुल दिसे डुल
कानातील अलंकार |
झोका फुलांचा सोनेरी
जसा नवलखा हार ||२||
येई वाऱ्याची झुळूक
करी मंत्रमुग्ध वास |
रस शोषण्यास गर्दी
किट पाखरांची खास ||३||
फुल मोठे बहुगुणी
करतात तरकारी |
भजे,मोकर खायला
असतात गुणकारी ||४||
भाजलेल्या जखमास
पान मोठा गुणकारी |
ताप, कोरडा खोकला
दुर करतो विकारी ||५||
लांबलांब गोल शेंग
पोटासाठी गुणकारी |
बाळंतीन, मुले आणि
प्राण्यांसाठी हितकारी ||६||
बहाव्याची साल, मुळे
येई औषधीच्या कामी |
धुंगी, काढ़ा पण करे
ताप, सर्दीस निकामी ||७||
बनतात खोड़ामुळे
शेतातील अवजार |
सरपणासाठी येती
कामी लाकूड बेकार ||८||
अशा सगुणी वृक्षाचे
करा तुम्ही संवर्धन |
वृक्ष लावा जीवनात
सांगतसे गोवर्धन ||९||