ब्रम्ह जैसे तैश्या परी
ब्रम्ह जैसे तैश्या परी
ब्रम्ह जैसे तैश्या परी । अाम्हा वडील भुते सारी ।।१।।
हात अापुला अापणा लागे । त्याचा खेद करू नये ।।धृ.।।
जीभ दातांनि चाविली । कोणे बत्तीसी ताडिली ।।३।।
थोर दुखावले मन । पुढे उदंड शहाणे ।।४।।
चणे खावे लोखंडाचे। मग ब्रम्हपदी नाचे ।।५।।
मन मारूनी उनमन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।६।।
