STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics

4  

Sanjana Kamat

Classics

बंध रेशमाचे

बंध रेशमाचे

1 min
209

जीवनाचा खेळ सारा,

पाहे नात्यांचा पसारा.

कटपुतली मोहरा,

मायाजालचा भोवरा


बाल लीलेचे आगंण,

जीवन शोधे चांदण.

लग्न मंडपी प्राक्तन,

झरे अश्रूंचे आदंण.


शोधे मनी वसणारा,

संघर्षात जपणारा.

सुखासाठी झटणारा,

सप्त रंगी मोहणारा.


पाठलाग कस्तुरीचा,

मोरपंखी त्या क्षणांचा.

बंध असे रेशमाचे,

प्रिय प्रेमळ सख्याचे.


तारूण्य हळूच सरे,

रम्य संसारी गुंतले.

क्षुद्र खोटी नाती जपे,

स्वर्ग येता कळलेले.


श्वास अंतिम खुणवे,

एकटीस खेळवावे.

मोहमाया संगें रडे,

चक्रव्यूह ऋण फेडे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics