बळीराजा
बळीराजा
हलगी वाजू दे रे देवा
हलगी वाजू दे
बळीराजाच्या पोटाची रे
खळगी भरू दे..
तहानलेल्या डोळ्याची रे
व्यथा मांडू दे
राजाच्या रे हक्कासाठी
आता रगत सांडू दे..
आण - आण जोडूनी रे
रान पिकवलं
तुझी कृपा अशी की रे
आभाळ फाटलं..
मरण झालं खोटं
अन् पैस झालं मोठं
पैशाच्या या व्यसनापायी
आता सरण सरू दे..
हलगी वाजू दे रे देवा
हलगी वाजू दे
बळीराजाच्या पोटाची रे
आता खळगी भरू दे...
