STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy Others

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy Others

भुक

भुक

1 min
338

फाटक्या लुगड्याचा पदर

पाघंरून

ती माय घर घर फिरत होती

आपल्या लेकरांसाठी

गोडधोड मागत होती

मांगल्याचे दिप पेटतं असताना

त्या मायच्या पोटात भुक जळत होती

खर तर त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी दिवाळी होती


एकिकडे घरात लक्ष्मी पुजली जात असताना

त्याच घराच्या बाहेरून

ती माय भाकरीसाठी 

आवाज देत होती

फटाक्यांची आतिषबाजीत

मिठाई वाटली जात असताना

भेकेने व्याकुळ झालेली लेकर

मायला बिलगुन पहात होती

त्याच लेकरांनसाठी ती माय फाटका पदर पुढे करून

काहितरी द्या म्हणून

हात जोडत होती

पण पदरात काहीच पडत नव्हते तेव्हा

माय बिचारी भुक घेवून

एक एक घर ओलांडत होती


ती दहा घर फिरली

तेव्हा एका घरातुन मिळाले

शिळेपकळे पदरात बांधून

पाय घराकडे वळाले

खुप काही मिळाल्याच्या आनंदात

लेकरं पोटभर खात होती

लेकरांच समाधान पाहून माय उपाशीच राहीली होती

तेव्हाच त्याच्या झोपडीत

त्या मायन दिवाळी पाहिली होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy