भ्रष्टाचाराचे तांडव
भ्रष्टाचाराचे तांडव
भ्रष्टाचाराचे उठलं तांडव,
देवा कुठतरी खेळ हा थांबव.
धूर्त नेत्यांची एकमेका साथ,
जनतेला केलं त्यांनी अनाथ.
पोटासाठी गोरगरीब घाम गाळतो,
सत्ताधारी प्रत्येक वेळी मीजाशी मारतो .
सामान्य जनता ही भोळीभाबडी,
खुर्चीवर बसणारे करतात त्यांशी लबाडी,
कर्जापायी शेतकरी अनेक मरले ,
पुढाऱ्यांनी मात्र स्वतःचे घर भरले.
बेकारी संग गरिबी आज वाढली,
स्वार्थी नेत्यांची इथे भ्रष्टाचारी नडली .
दीनदुबळ्यांची पेटते रोज चितेची होळी,
भ्रष्टाचारी खातो आहे पुरणाची पोळी .
म्हणून म्हणतो......................
भ्रष्टाचाराचे उठले तांडव ,
देवा ! कुठंतरी खेळ हा थांबव. .....
