गरज मैत्रीची
गरज मैत्रीची
1 min
282
मैत्री तुमची हृदयात आहे,
दूर जाऊन तुम्हीही
ओढ लागली तुमची आहे,
परकी तुम्ही असूनही
सुखदुःखाचे वाटेकरी सारे,
गरज तुमची मज आजही
चुकतो कुठे क्षणाक्षणाला,
होता आपण मार्गदर्शकही
पोरका असता कधी मी,
सखा तुम्ही मायबापही
पैसाअडका जवळ आहे
मित्राविना नाही त्यास अर्थही
जुन्या आठवणी स्वप्नात त्या,
येतात रात्री-अपरात्रीही
तुम्ही मित्र हो हवे आहात,
मी विसरु पाहिले तरीही
मी विसरू पाहिले तरीही...
