भरारी....
भरारी....
पटावरचा डाव ना माझा,
विजयस्तंभ माझ्या वेशीत।
हवेचा हात धरीला जरी,
वार झेलण्यात मी निष्णात ।
ग्रीष्मातील पानगळ जरी,
आयुष्याचा केला मी वसंत।
चित्र रेखाटले गगनावरी
रंगुनी वादळांच्या रंगात ।
भळभळले हे हृदय जरी,
चालेल मी रक्त गोठवत।
चालायचा प्रवास जीवनी,
ऋतुत दुःखाच्या मोहरत।
मार्ग कंटकांचा माझ्यासवे,
वेदना माझी सखी सोबत।
एकटाच अबोल हसतो,
माळावर चाफा बहरत।
उभारण्यास मनाची शिडे,
उसना घेतला हा उसंत।
भरारी रोकणार कोण ही,
गरुडाचे बळ आहे अंगात।
मोडला ना हिंमतीचा कणा,
लढण्यास जोम धमन्यांत।
जातील आता नभला तडे,
'नूतन' तेज हे लढा देत ।
