STORYMIRROR

अनु...🍁🍁 c

Tragedy

3  

अनु...🍁🍁 c

Tragedy

अंत....

अंत....

1 min
223

पापण्यांची ओल सांगे जीवनाची हार आता,

चांदणे मंदावलेले, भासतो अंधार आता।


खेळ दुनिया मांडते का भावनांचा, यातनेचा,

फोल झाली सांत्वनाही, वाटते व्यवहार आता।


जीवनाच्या सागराने, घेतले जे हेलकावे,

आज होडीला किनारा लांब वाटे फार आता।


घात नियतीने सदाही, का करावा आयुष्याचा,

वार सारे सोसुनी मन जाहले लाचार आता।


पाय घेता निसटता मज, अंत काही सापडेना

रिक्त झाली आज झोळी, व्यर्थ हा संसार आता।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from अनु...🍁🍁 c

Similar marathi poem from Tragedy