बहर नक्षत्रांचा काव्यस्पर्धा
बहर नक्षत्रांचा काव्यस्पर्धा


जाळून टाका ते प्रेमाचं अग्निकुंड,
नेहमी नेहमी हृदयाचा दाह होण्यापेक्षा,
होऊ द्या एकदाचं दहन त्याचं..
धगधगत्या अग्निकुंडात फेका काढून,
होऊ द्या भावनांची राख अन् आठवणींचा कोळसा,
आणि निघू द्या धूर काळजातल्या प्रेमाचा..
तीच राख गोळा करून,
फेकून द्या मातीत,
त्या राखेने माखून जन्माला येणार एकेक बीज सांगेल,
प्रेमाच्या जंगलात राख होईपर्यंतचा प्रवास किती जीवघेणा असतो ते...