भक्तीरंग
भक्तीरंग
पांडुरंगा एक देई
वरदान मज देवा
अंतर्बाह्य रंग कसा
भक्तीचाच असो द्यावा १
भक्ती रंगात गोपीका
सर्व जग विसरल्या
नाही काही भान आता
हरी प्रेमे गुंग झाल्या २
भक्ती रंगात हरिच्या
गेली द्रौपदी रंगून
प्रेमासाठी तो कृष्णेच्या
आला आला तो धावून ३
कृष्ण कृष्ण नाम घेता
मीरा कृष्णात रंगली
तन मन विसरूनी
कृष्ण प्रेमात बुडाली ४
