भावनांची ढगफुटी
भावनांची ढगफुटी
ढगफुटी व्हावी तसा पडतोय तो पाऊस,
पण मनातल्या पावसाचं काय..?
तो पाऊस मात्र अजूनही
वाट बघतोय बरसण्याची.
बाहेर तुफान पाऊस आहे,
पण मनातल्या पावसाला..
त्याला काही वाट फुटत नाहीये.
वाटतं तोही मनातल्या सगळ्या भावना बाहेर काढतोय.
पण मनातल्या पावसाला बाहेर यायला जमेल असं काही वाटत नाहीये.
पण येईल तोही बाहेर येईल... एक दिवस..!
