STORYMIRROR

Hemangi Sawant

Others

4  

Hemangi Sawant

Others

आज मी एकटीच त्या पावसात भिजतेय

आज मी एकटीच त्या पावसात भिजतेय

2 mins
839

कारण सोबतीचा तो कधीच पुढे निघुन गेलाय.

आज मी मात्र त्या सरीमध्ये एकटीच भिजतेय,

तो प्रत्येक क्षण आठवते, जो त्याच्या सोबत घालवलाय.

आज मी एकटीच त्या पावसात भिजतेय....


एके काही त्याच्या सोबत भिजायचे,

पण ते क्षण आता मात्र आठवण होऊन उरलेत. 

त्या पावसात होणारा स्पर्श आजही मी आठवतेय,

आज मी एकटीच त्या पावसात भिजतेय.....


पावसात ओले चिंब झालो की, 

मग कुठे तरी असेच उभे राहुन वाट बघावी लागे पाऊस कमी होण्याची,

त्यातच अचानक झालेल्या गडगडाने मी नकळत त्याला मिठी मारे,

तो देखील तो क्षण भारी एन्जॉय करी आणि मला आनंदाने आपल्या कवेत घेई.


त्यातच त्याचा तो गरम स्पर्श आजही हवा हवासा वाटतोय

पण तो गेलाय निघुन, मी मात्र अजून ही वाट बघतेय,

त्या वळणावर उभी राहुन.


प्रत्येक पावसात आम्ही छान पिकनिक काढु,

निसर्गात दोघेच हरवुन जाऊ.

आज पाऊस आहे, निसर्ग आहे,

पण सोबतीचा तो मात्र कधीच पुढे निघुन गेलाय,

म्हणून, आज मी एकटीच त्या पावसात भिजतेय....


कधी बटाटा वडा तर कधी कांदाभजी,

पण त्याची आवडती फेसाळ चहा सोबत बटाटाभजी.

मी मात्र त्याला टक लावून खाताना बघे,

हळुच सर्वांच्या नकळत त्याने भरवावे या आशेवर,

कदाचित त्याला माझ्या मनातील भाव कळावे.


आज सर्वकाही राहून गेलंय, तो ही निघुन गेलाय,

परतीच्या प्रवासाला न येण्यासाठी,

पण मी मात्र वाट बघतेय त्याची, त्या प्रत्येक पावसाच्या सरी सारखी.

कारण मनाला ही म्हाहित आहे, तो परत कधीच येणार नाहीये 

तरीही हे हळवे मन त्याचीच वाट बघत बसले आहे.


अजूनही झुरतेय मी त्याच्या स्पर्शासाठी,

जशी धरती झुरत असते पावसाच्या मिलण्यासाठी.

आज बाहेर मुसळधार पाऊस त्या धरतीला आपल्या कवेत घेतोय कधीही दुर न जाण्यासाठी,

पण मी आज मी एकटीच त्या पावसात भिजतेय त्याच्या आठवणीत,

तो परत यावा आणि मला ही आपल्या कवेत सामावून घ्यावा,

पण ते मात्र शक्य नाही, वाट बघतेय तू परतावास,

आणि मिठीत माझ्या विरून जावास,पण ते आता शक्य नाही,


म्हणुन, आज मी एकटीच त्या पावसात भिजतेय...


Rate this content
Log in