STORYMIRROR

Chandrakant Khose

Inspirational

3  

Chandrakant Khose

Inspirational

भाऊबीज

भाऊबीज

1 min
331

नाते बहीण भावाचे

प्रेम अन विश्वासाचे,

ऋणानुबंध हे

आपुलकीने जपण्याचे. ॥१॥


बहीण भावाचा

सण सौख्याचा,

आपुलकीच्या नात्याचा

निखळ आनंदाचा .  ॥२॥


बहिणीची असते 

भावावर अतूट माया ,

मिळो भावाला नेहमी

प्रेमाची लय भारी छाया. ॥३॥ 


भावाची असते 

बहिणीला सदैव साथ

मदतीला देतो

नेहमीच प्रेमळ हात ॥४॥


सोनेरी प्रकाशात 

पहाट झाली

आनंदाची उधळण

करत भाऊबीज आली ॥५॥


सोनियाच्या ताटी 

उजळील्या ज्योती 

ओवळीते भाऊराया वेड्या 

बहिणीची वेडी प्रिती    ॥६॥


भाऊ- बहिणीचे प्रेम 

म्हणजे तुझं अन माझं जमेना

तुझ्याविना मला 

काही करमेना        ॥७॥


निराळ्या मायेचा झरा

कायम तुडूंब भरलेला 

वाहत राहो निखळपणे 

भाऊबिजेच्या या सणाला ॥८॥


कुठल्याही नात्यात नसेल

एवढी आहे ओढ

म्हणूनच भाऊ- बहिणीचं

नातं आहे खुप खुप गोड   ॥९॥


दोन शब्द गोड प्रेमाचे 

वाटे आधार मग बहिणीला

लोभ नाही तिच्या रक्तात

मायेने जीव लावा तिजला ॥१०॥


नातं हे प्रेमाचे नितळ अन निखळ

मी सदैव हृदयात जपलय

हरवलेले ते गोड दिवस त्या 

मधुर आठवणीत मन रमलय ॥११॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational