भांडण...(खर प्रेम)
भांडण...(खर प्रेम)
बायको परमेश्वराने
संसारी मानवाला
दिलेले एक इच्छित वरदान आहे....!
असा रास्त समज
असलेलं ते एक
खरे पाहता बारदान आहे...!
असून अडचण
नसून खोळम्बा
अस ते मोठ पसायदान आहे...!
हवं तेंव्हा
पांघरण्याचं मजबूत
आच्छादन आहे...!
गारव्यात ऊब
उखड्यात थंडावा
अस ते त्रिकालातीत रसायन आहे...!
घोडा, पाणी
आणि बायकोच मन
अंत न लागणार ते मोठं कोड आहे...!
जो तरला तो जिंकला
म्हणण्या सारखं
ते दुधारी तीक्ष्ण अस्त्र आहे ...!
हे अस्त्र जीवन
सार्थकी लागण्यासाठी
परमेश्वराने दिलेलं गोड शस्त्र आहे....!
वाटत कधी कधी
समाधानाच
बोऱ्या वाजवणार आंदण आहे...!
म्हणून तर
संसारी मानवाच्या
जीवनात रोज भांडण आहे...!
भांडणातच
खर प्रेम
दबा धरून बसले आहे......!
भांडतानाच
मला तरी ते
सदैव दिसले आहे.....!

