STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

3  

Vijay Sanap

Inspirational

बदला

बदला

1 min
1.0K


औकात नाही तुमची

आमच्याशी पंगा घेण्याची

वेळ येईल तुमच्यावर

चीनला भीक मागण्याची ।।


अभिमान वाटतो मला

माझ्या वीर सैनिकांचा

सीमा पार करुन केला हल्ला

नाही विचार केला कशाचा ।।


अरे घेतला आम्ही बदला

ठेचून काढले आतंकवादी

पुन्हा सांगतो पाकड्यांनो

नका लागू आमच्या नादी ।।


अरे मारले आमचे चाळीस

आम्ही ठोकला तिनशेचा आकडा

आता परत मागे पाहू नका

नाही मिळणार काश्मीरचा तुकडा ।।


सलाम माझ्या वीरपुत्रांना

रक्त वाहिले देशासाठी

ठेऊ जाणीव कर्तुत्वाची

उभे राहू सदा तुमच्यापाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational