बैसविती हरी अस्त्र
बैसविती हरी अस्त्र
बैसविती हरी अस्त्र घडीवरी ।
पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥
धाउनी गळां पाले माळा त्या वाहाती ।
गजरें नाचती पुढें येक ॥२॥
टिरीया माडिया वाजविती पाय ।
हरुषें नाचताहे देवराया ॥३॥
ऐसें नित्यानित्य क्रीडा ते करिती ।
देव ते पाहाती विमानीं तें ॥४॥
म्हणताती देव वंचलों या सुखा ।
एका जनार्दनीं देखा गोवियलें ॥५॥
