STORYMIRROR

vaishali vartak

Romance

2  

vaishali vartak

Romance

बावरे हे मन

बावरे हे मन

1 min
54

 कसे सांगू तुला मी

 मन हे झाले बावरे

कधी येशील जवळी

सखया भेटण्या धाव रे


वाट पाहूनी सखया

लागे न लक्ष कशात

कसे समजावू मनाला

जीव गुंतला तुझ्यात


वा-याची झुळूक ही 

अलगत स्पर्शूनी जाता

सांगे कानात सांगावा

तुझ्या येण्याचा आता


बघ तो चंद्र नभीचा

त्याला आहे जाणीव

माझ्या मनाची त्याला

कळतेय आज उणीव


वाट पहाण्याची सख्या

माझ्या मनाची रीत

बघ सांजवेळ झाली

धुंद मनी ही प्रीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance