बाल गीत
बाल गीत
होणार परी
फ़्राक तो सुंदर
घाली मनोहर
मी माऊं जरी ||1||
गुलाबी गाल
मेकअप छान
मग नसे भान
रिबीन लाल ||2||
हवे सँडेल
उंच ते टाचाचे
गुलाबी रंगाचे
होई मॉडेल ||3||
वेधते लक्ष
शेपटी ही छान
सौदंर्याची शान
बुद्धी ही दक्ष ||4||
थोडा झटका
कॅट वॉक करी
दिमाखात जरी
नाच लटका ||5||
हर्ष अंतरी
स्वप्न मनोहर
उद्याचे सुंदर
विश्व सुंदरी ||6||
