बाकी आहे
बाकी आहे
हातात हात घेतांना
वचने ही विसरु नको
तुझा सहवास मिळाला
जगणे अजून बाकी आहे
तुला नुकतेच पाहिले
नजरेत भरने बाकी आहे
दोन शब्द बोलले
ह्दय खोलने बाकी आहे
दवबिंदुची पाती
अश्रु लपवतील का माझे
तुझ्या सोबतची स्वप्न
पहाणे अजुन बाकी आहे
तुझे चुकले तरी
समजुन घेईल तुला
अजुन बाकी आहे
दुनियादारी सांगायची तुला
तुझ्या माझ्या प्रेमाला
लागु नये कोणाची नजर
म्हणुन एकच फुल दिले
हळुच सांगते गुलदस्ता अजुन बाकी आहे
फेकाफेकी नको मला
दोन शब्द प्रेमाचे बोल
चंद्र आहे डोक्यावर
सूर्य यायचा बाकी आहे
नजरेची भाषा कळली
शब्दांना काही सांगायचे आहे
होकार ऐकण्यासाठी तुला
मुक्या भावना समजने बाकी आहे
नात जोडल दिव्याशी
जळण्याचा करार बाकी आहे
मालवतांना दिव्याची वात
प्रकाश देण्याचा विचार बाकी आहे

