अवतार
अवतार
भान रंगाचे भटकत आहे
मनात थोडे खटकत आहे
त्या रंगाला जाम टरकतो
ज्या रंगाची हुकमत आहे
जगण्याचे ते सूर हरवले
मरणालाही हरकत आहे
किती वादळे झेलून गेलो
नवे वादळ झुलवत आहे
जुन्या कढीचा ऊत नवा
नग्न होवून भटकत आहे
मुह मे राम बगल मे छुरी
स्वार्थापुरती परजत आहे
अघोषित घोर आणीबाणी
वाऱ्यालाही चिलखत आहे
मनूने नवा अवतार घेतला
बुद्ध अजून समाधीत आहे
