STORYMIRROR

Artist Sarika

Romance

3  

Artist Sarika

Romance

असे काही प्रेमात तुला द्यावे

असे काही प्रेमात तुला द्यावे

1 min
272

असे काही प्रेमात तुला द्यावे

निरंतर स्मरणात तुझ्या राहावे,

तुझ्यात हरवूनी जाताना

माझीच मी न उरावे..


बंद जाहल्या जरी पापण्या

हृदयात तुझ्या मी दिसावे,

फुलांसवे मज जपताना तू

प्रितीचे सूर जुळावे..


मौनात जरी अबोला

शब्दांविन सारे कळावे,

मुक्तपणे उधळोनी तरंग

सुगंध मनी या दरवळावे..


असे काही प्रेमात तुला द्यावे

पाऊलखुणांनी ना पूसावे,

आठवणींच्या गोडव्यात मग

प्रितीचे ठसे उमटावे..


असे काही प्रेमात तुला द्यावे

अनमोल क्षणांनी ही मोहरावे,

तुझ्यात सामावून जाताना

तुझी अन् तुझीच मी होऊन जावे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance