प्रतीक्षेतील प्रेम
प्रतीक्षेतील प्रेम
1 min
273
तू माझा किनारा
परतीची ओढ लावणारा,
मी शीणलेला पाणतस्थ
तुझ्या विसाव्यास टेकणारा
तू अथांग महासागर
मला तुझ्यात सामावून घेणारा,
माझ्या भरकटलेल्या जहाजाला
किनाऱ्यावर तारूण नेणारा..
तू ध्येयाचं वादळ
शोधूनही ना सापडणारा,
मनात घोंगावत्या प्रश्नांना
अचूक वाट दाखवणारा..
तू माझा सहारा
मनाची कवाडे उघडणारा,
मनात साचती अडगळ मग
अलगद रिती करणारा..
तू वसंत माझ्या हर्षाचा
नवचैतन्यात मी रुजणारी,
मी सोसलेली पानगळ
तुझ्या अस्तित्वाने बहरणारी..
तू प्रेम माझ्या प्रतिक्षेतील
स्वप्नात तुला मी पाहणारी,
दरवळ मनी तुझा असा हा
फुलांसवे मी जपणारी
