STORYMIRROR

Artist Sarika

Romance

4  

Artist Sarika

Romance

"एक प्रेम असंही..."

"एक प्रेम असंही..."

1 min
428

रूसलेला चाफा पावसात भिजू लागला

मनावरणारा केवडा खुदकन गालात हसू लागला,

रातराणीचा चोहीकडे दरवळ सुटला

सूरजमुखीला व्याकुळ होऊन बांध मग फुटला..

टपकन पडून पारिजात रडू लागला

बघता बघता तो निशिगंधही झुरु लागला,

मोगऱ्याने फुलून चाफ्याला विळखा घातला

असा कसा सये साऱ्यांना तुझाच लळा लागला..!

कोपऱ्यातील अव्यक्त बकुळीही बोलू लागली

जाईजुई मनातून तरमळू लागली,

गुलाबही ओठांचा मकरंद मागू लागला

तुझ्या एका नजरेने रानफुले डोलू लागली

बघ सये तुझ्या प्रेमासाठीच तर सारी मनसोक्त फुलू लागली..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance