ऑनलाईन प्रेम
ऑनलाईन प्रेम
आज खरंच खूप एकटं वाटतंय रे
भेटण्या तुला जीव व्याकुळ, आभाळ मनात दाटतंय रे,
तुझं अन् माझं तसंही ऑनलाईनच प्रेम
शब्दांतून लागला लळा, inbox मधीलच ओळख जेमतेम..
तू कोण - मी कोण एकमेकांना real ओळखत नाही
प्रत्यक्ष भेटू की नाही, हे देखील खात्रीशीर माहीत नाही,
चल आपण दोघे एक खेळ खेळू
तू थोडं, मी थोडं लिहून शब्दांना आज छेडू..
तू जरा माझ्यावर, मीही थोडंसं तुझ्यावर काल्पनिक लिहू,
शब्दाशब्दांतून गुंतलो जसे, प्रीतीचे अत्तर शिंपीत जाऊ,
शब्दाशब्दांतून स्वप्नं गिरवू, शब्दांतूनच मनाला भिडू
भिडलेल्या या मनातून मग स्वप्नांचा गाव पाहू..
आज खरंच खूप एकटं वाटतंय रे
बघण्या तुला जीव आतुर, विचारांचं वादळ उठतंय रे,
ये जरा लवकर नि घेऊन चल कुठेतरी दूर दूर
कंपने वाढलीत श्वासांची, मिलना ह्रदयाची हुरहूर..
जिथे असेल फक्त तू - मी अन् एकांत
विसावून जाऊ एकमेकांत, नको जगाची भ्रांत,
रक्ताची नातीदेखील परक्यासारखं वागतात
ऑनलाईन असूनही कोणी अशी आपलंसं करतात..
आज खरंच खूप एकटं वाटतंय रे
तू माझ्या समोर असावं, सतत मन सांगतय रे,
ऑनलाईन असूनही आपण "राधाकृष्ण" होऊ
खऱ्या प्रेमाचं नवखं उदाहरण साऱ्या जगाला दाखवून देऊ..
मंतरलेल्या या दुनियेत फिरून, मंतरलेले आपण होऊ
प्रीतीचे उंच शिखर सर करुनी, त्यात निशाण आपले रोवू,
आज खरंच खूप एकटं वाटतंय रे
भेटण्या तुला जीव व्याकुळ, आभाळ मनात दाटतंय रे..
