अर्धनारिश्र्वर / किन्नर
अर्धनारिश्र्वर / किन्नर
किन्नर हे नाव हल्लीच कळलं
किन्नर हे नाव हल्लीच कळलं
पण त्यांचं आयुष्यात नक्की काय चुकलं?
पण त्यांचं आयुष्यात नक्की काय चुकलं?
त्यांनी सुद्धा आपल्यासारखे आईच्या पोटी जन्म घेतला
आईनेसुद्धा सगल्यांसारख्याच त्याच कला सोसल्या ..
आईच्या पोटात असेपर्यंतच सगळ्यांचे लाड,
बाहेर आल्यावर तितकाच सामाजिक तिरस्कार..
काय चुकलं ? कोणाचं चुकलं?
त्यांच्याच रक्ताच्या माणसामध्ये, अचानक
परकेपणा दिसले..
मोठेपणी नको नको त्या वेदना सोसल्या ,
पण फार बाऊ न करता सहज सोसल्या ...
ती वेगळी आहे पण माणूसच आहे ,
ती सुंदर नाही ,पण तिलाही मन आहे,
अगदी आपल्यासारखच देवानेच तिला बनवलं आहे..
अर्धनरिश्र्वर देवतांना सगळ्यांनी स्वीकारले
आणि माणसातल्या किन्नराला तितकच झिडकारले...
थोडासा प्रेमाचा हक्क त्यांनासुद्धा आहे,
किन्नर नाही " माणूस" बोलण्याचा हक्क त्यांनासुद्धा आहे..ll 2 ll
