ऐकलंय, की...
ऐकलंय, की...
ऐकलंय,
की कुणी एक अरसिक
भर पावसाळ्यात
भिजायचा राहिलाय..
मग तो पाऊस
परत परत येईल,
नाहीतर काय करील ?
माझं ऐक,
एकदा,
फक्त एकदाच,
चिंब भिजणं कसं असतं,
ते अंग भरून, मन भरून अनुभव.
ऋतू बदलून जाईल बघ!

