अहो क्रोध यावे कोठे
अहो क्रोध यावे कोठे
अहो क्रोध यावे कोठे। अवघे अापण निघोठे ।।१।।
ऎसे कळले उत्तम । जन तेची जनार्दन ।।धृ.।।
ब्रीद बांधिले चरणी । नये दाविता करणी ।।३।।
वेळ क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ।।४।।
ऎसी थोर दृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।
