STORYMIRROR

Riya Pawar

Romance Classics

4  

Riya Pawar

Romance Classics

अगम्य प्रेम राधा कृष्णाचे

अगम्य प्रेम राधा कृष्णाचे

1 min
293

कान्हा तुझ्या मुरलीची 

मला लागलीय गोडी

किती सावरू मनाला 

मन तुझ्याकडेच ओढी ..!!


तुझ्या सवे गवळणींची 

रासलीला चाले

साहवेना एकटीला 

मन कान्हा कान्हा बोले ..!!


तुझ्याविणा मन माझे 

ना कुठे आता लागे

सुनी सुनी दुनिया सारी 

मी साथ तुझी मागे..!!


कान्हा तुझा प्रेमभाव 

अगदीच सोपा आहे

राधेचं प्रेम तसही 

अगदीच अगम्य आहे...!!!


का रे कान्हा मला तुझी 

अशी ओढ लागली

तुझ्यासाठी तुझ्या आठवणीत 

राधा किती रात्र जागली..!!!


राधाकृष्णाच्या नावाचा 

अध्याय प्रेम आहे

तुझ्याविणा कन्हैय्या 

राधा आजही अधुरी आहे ..!!


तुझ्या बासुरीच्या सुराने

तु राधेचं मन जिंकले

मी ही वेडी झाले आता 

मी माझी न राहीले..!!!


जरी बदले 

रंग जीवनाचा 

काळ आता आला 

देवघेवी व्यवहाराचा..!!!


निरंतर प्रेमाची गंगा 

वाहे राधेच्या मनी

कृष्ण सखा व्यापून 

राहीला राधेच्या जीवनी..!!!


जग रंगले प्रेमरंगात

राधाकृष्णाच्या लीलांत 

राधा आजही बावरी 

कृष्णाच्या बासुरी सुरांत...!!!


नजर राधेची आता 

कृष्णाच्या वाटेकडेच रोखली

ये ना कान्हा भेटावयासी 

किती विरह वेदना सोसली..!!


प्रितीमध्ये तुझ्या सख्या 

माझे देहभान हरपली 

नको आता करू उशीर 

राधा कृष्णाविणा तरसली..!!!


कृष्ण नाही नशीबी 

राधा नाही हिरमुसली 

मनानेच प्रेमाची तिने 

चिरंतन साथ दिली...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance