ऋण माझ्या लेखणीचे
ऋण माझ्या लेखणीचे
1 min
172
धारदार अक्षरांना लावण्याचा साज आहे
नित्य माझ्या लेखणीत संस्कृतीचा साज आहे
बंदीवान चौकटीला ठोकरलं लेखणीने
अस्तित्वाच्या लढाईत जिंकलेय स्वकष्टाने
मनातल्या भावनांना साथ दिली लेखणीने
आभाळाला भिडलेय निर्भिडत्या ठामपणे
धडपड माझी होती लेखणीला भेटण्याची
लेखणीच झाली माझ्या जन्मदाती अक्षरांची
व्यासंगीक वैचारिक तळपत्या भावनांची
लेखणीने दाखवली वाट मला सन्मार्गाची
बोट लेखणीचे माझ्या आता सुटणार नाही
अखेरच्या श्वासातही बंध तुटणार नाही
खूप काही दिलं मला निरंतर पुरणारं
लेखणीच्या कृपेमुळे अमरत्व लाभणारं
विसरता येत नाही ॠण माझ्या लेखणीचे
झाले साकारीत आता स्वप्न माझे साहित्याचे
