अबोला
अबोला


तू बोलत नाही आज.. मी ही बोलत नाही आज.
हा कसा अबोला आज.. आम्ही बोलत नाही आज..
तुला वाटते माझेच चुकले.. मला वाटते तुझे.
देव जाणे चुकले कोण.. काही कळत नाही आज..
तू सोबती होता माझा.. मी होतो तुझ्या सोबत.
झालो दूर दूर आज.. आम्ही सोबत नाही आज..
घडले जे काही काल जरासे.. तुझ्या अन् माझ्यात.
का हा दुरावा नात्यामध्ये.. समजत नाही आज..
तू ही तसा स्वाभिमानी.. मी ही असा स्वाभिमानी.
तुटले नाते तुझे माझे.. का जोडत नाही आज..