जगणे झाले मंद
जगणे झाले मंद


शहरं अशी ही थबकलेली, गावं ही झाले बंद.
आगत स्वागत थांबलेले, पाहुणे झाले बंद..
घरीच शिकती मुलं बिचारी, शाळा कॉलेज बंद.
कार्यालयं ही ओस पडली, मंदीर मस्जिद बंद..
दहशत बसली मनामध्ये, रस्त्यावरचे फिरणे बंद.
घरालाही घरपण आले, बाहेरचे ते खाणे बंद..
कोरोनाचे फिरणे जगभर, माणसे झाली घरात बंद.
काय करावे घरी दिवसभर, उफाळून आले छंद..
सवयीचा गुलाम माणूस, ठेवी अनुभव डब्यात बंद.
वाईट गोष्टी चालू सर्व, चुकीचे ते कुठे बंद..
आता तरी बदल माणसा, होऊ दे गर्व तुझा बंद.
निसर्गाचा समतोल बिघडलाय, जगणे झाले मंद..