आयुष्याला सावरावे
आयुष्याला सावरावे
जीवनात असे काही व्हावे,
आयुष्याला वळणच यावे
मार्गच जीवनाचे खुलावे,
सर्व आयुष्याला सावरावे
सर्व काही अवघड नाही,
पाहिले तर सहज शक्य
गोंधळ मनाचा टाळूनच,
सिद्ध होईल मनाचे ऐक्य
आता आयुष्याला सावरावे,
मनाला हवे ते मिळवावे
पूर्ण करण्या आपल्या इच्छा,
सर्वस्वच पणाला लावावे
आयुष्याला सावरावे कसे,
आयुष्याला घडवावे असे
परिस्थिती बदलेल कधी,
दिसे तसेच, कधीच नसे
आयुष्याला सावरावे आधी,
जीवनाचा काय भरवसा
वेळेत करावे सर्व सिद्ध,
घ्यावा सर्वांनीच असा वसा
