आयुष्य
आयुष्य
आकाश पडलंय उडण्यासाठी
आणि तुला त्या बेड्याचं वाईट वाटतंय
आयुष्य पडलंय जगण्यासाठी
आणि क्षण गमावल्याचं दुःख वाटतंय
स्वप्नं पाहात होतीस त्या पंखाचं
आज ते आहेत तर
पडणायची भीती वाटते
स्वप्न मोठी असली तर
झेपही मोठी घ्यावी लागते
उडताना पडणं साहजिकच
आहे ना !!
मग भीती का ?
आकाशाची स्वप्न चालून
पूर्ण होत नसतात
मनाची गाठ बांध
पडणं साहजिक आहे
पण थांबणं आणि माघार
घेणं नाही
