STORYMIRROR

Shruti Ambilwade Malve

Abstract

4  

Shruti Ambilwade Malve

Abstract

आयुष्य फुलाचे!

आयुष्य फुलाचे!

1 min
741

कळी बनूनी फुलापरी

फुलत फुलत जावे,

फुल बनुनी मंद वाऱ्यावरती

झूलत झूलत जावे


परिस स्पर्शाने दवबिंदुंच्या

सजून नटून घ्यावे,

रंगीबेरंगी फुलावर रंगीत

फुलपाखरु यावे


फुलल्या फुलातून पराग कणांतून

गोडवा चाखावा,

फुलल्या फुलाने रंगीबेरंगी

रंग उधळत जावा


नंतर कोणी मग हळूच येऊन

मंदिरात न्यावे,

नाहीतर सुंदर अशा कुणा

लांब केसात माळावे


नाहीतर कोणी येऊन

प्रेयसी कडे न्यावे,

नाहीच झाले जरी काही

तर सुंदर त्या सुंदर फुलाने


झाडा वरीच कोमजावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract