कोण आहे मी????
कोण आहे मी????
1 min
425
आईची छकुली की
बाबाची लेक आहे मी
भावाची बहिण की
ताईची सावली आहे मी
मी अजुनही ठरवतेय
कोण आहे मी?
माहेरची लक्ष्मी की
सासरची सुन आहे मी
पतीची अर्धांगीनी की
बाळाची आई आहे मी
मी अजुनही ठरवतेय
कोण आहे मी?
एका घरी पाहुणी तर
दुसरीकडे परके धन आहे मी
एकिकडे आवाज तर
दुसरीकडे शांतता आहे मी
मी अजुनही ठरवतेय
कोण आहे मी?
माहेरची लेक लाडकी की
सासरची सुन पण मी परकी
प्रेमाचा ज़रा निखळ की
मायेचा अथांग सागर मी
मी अजूनही ठरवतेय
कोण आहे मी??????
