आयुष्य कसं मनमोकळेपणाने जगायचं असतं....
आयुष्य कसं मनमोकळेपणाने जगायचं असतं....
नको ते मोठयाने ओरडणे, नको तो अबोला
कारण,आयुष्य कसं मनमोकळेपणाने जगायचं असतं...
नको लबाडी, नको ते नुकसान
नको ती रडारडी,नको ते शब्द
कारण,आयुष्य कसं मनमोकळेपणाने जगायचं असतं...
हा पण ते जगत असताना भान मात्र ठेवायचे असतं;भान कशाचे ठेवायचे ते पहा आता ....
भान असावे वेळेचे ,
भान असावे शिस्तेचे
भान असावे नीटनेटके पणाचे; नको कुणाशी भांडण, नको कुणाशी तंटा
भान असावे वागणुकीचे,
भान असावे स्व पणाचे,
भान असावे माणुसकीचे,
कारण,आयुष्य कसं मनमोकळेपणाने जगायचं असतं....