आठवणीत तुझ्या एक रात्र जागलेली
आठवणीत तुझ्या एक रात्र जागलेली
कासावीस चित्त माझे,
बेफाम झालाय हा सांझ वारा,
किर्रर्र किड्यांची सूक्ष्म चाहूल
वेधणारा माझ्या मनाचा पडका वाडा,
अशातच तुझ्या आठवणींची गार झुळूक सुटलेली…
जशी बागेतल्या रातराणीला एक कळी उमललेली
आठवणीत तुझ्या एक रात्र जागलेली…!
आठवणीत तुझ्या एक रात्र जागलेली…!
डोळ्यांना लागलेली तुझीच हुरहूर
पण शब्द माझी गोठलेली …!
ओठ माझे झालेत मुके
पण छाती मात्र पेटलेली…!
खवळलेल्या नदीकिनारी जणू
वसती शांत विसावलेली….
पण अचानक नाव तुझे घेता
नभी चांदणी ती तुटलेली…
आठवणीत तुझ्या एक रात्र जागलेली…!
अनेकांसाठी ही निशा...काळरात्र ठरलेली
कांहींच्या वेदनेत ही रती...साखळदंडात जखडलेली
पश्चातापाच्या अश्रूत न्हाऊन ती
कायमची पावन झालेली…
अधीर जीवांच्या मिठीत कुठेतरी
हीच रात्र आकंठ प्रेमात बुडालेली
पण माझी मात्र ...विरहात रात्र
तुझ्याच आठवणीत जागलेली
तुझ्या आठवणीत जागलेली…!
आठवणीत तुझ्या एक रात्र जागलेली…!

