आठवण मनातील साठवण
आठवण मनातील साठवण
अशा ह्या निवांत संध्या समयी,
आठवण येते दाटून घराची,
घरात असतो तेव्हा, नसते जाण त्या भिंतींची,
ना घरातील माणसांची,
आणि दुर्लक्ष करतोच नेहमी,
त्यांच्या कटकटीं कडील आपुलकीकडे,
आता नाही कोणाची कटकट मागे,
जी वाटते आता हवीहवीशी, शांतता ही बोचरी,
रोज आईचा असतो भुंगा मागे, काय स्वयंपाक करायचा,
काय तुला खायचं, हे करू की ते करु,
आत्ता नाही निवडी चे नखरे,
आत्ता जे मिळतंय ते खावं लागतंय गुमान,
कारण स्वतःलाच घ्याची आहे स्वतःची काळजी,
रोज दहा वेळा देते आई आवाज जेवण तयार आहे,
जेवायला या पण हातचा मोबाईल काही सुटत नाही,
आणि आले आई पाच मिनिटं ग रेटा असतो कायम,
मनात कल्लोळ भावनांचा, आठवण दाटते माझ्या आई ची,
भेटूच आपण सात दिवसांनी