STORYMIRROR

Dipa Kakde

Abstract

3  

Dipa Kakde

Abstract

आत्मभान

आत्मभान

1 min
220

आकाशाला गवसणी घालतेस

नित्य नवे क्षीतीज आखतेस

कर्तुत्वाने देदिप्यमान होतेस

पण मग भावनांचा बळी का होतेस ?

सखे, तू निश्चयाचा हिमालय आहेस 

आत्मभान राख !


निसटत्या क्षणांचे सोने करतेस

नशीबाला मात देत स्वयंभू होतेस

मानापमानाचं विष लिलया प्राशतेस

मग जन्मसिद्ध अधिकारांना का डावलतेस ?

सखे या सृष्टीची तु भाग्यविधाता आहेस

आत्मभान राख !


आव्हानांची साखळी असणारच

पावलागणिक अग्नीपरिक्षा होणारच

कारण अलौकिकतेच्या वलयात

कुरवाळलंय तुला या बेगडी व्यवस्थेने

सखे माणुस आहेस ,दैवी रुप नाहीस तू

आत्मभान राख !

मातृत्वाचं वरदान मिळालयं तुला

रक्तामांसात प्राणप्रतिष्ठा करते तू

आता माणुसकील जन्माला येऊ दे

संस्कार समानतेच्या तत्वावर होऊ दे

सखे, का दोष देतेस स्वतःला... तू केवळ कारणमात्र आहेस

आत्मभान राख!


Rate this content
Log in

More marathi poem from Dipa Kakde

Similar marathi poem from Abstract