STORYMIRROR

SATISH KAMBLE

Romance

4  

SATISH KAMBLE

Romance

आस तुझिया प्रितीची

आस तुझिया प्रितीची

1 min
911

नभ बरसला अन्

भिजवून गेला मातीला,

सुगंधित झाली माती जणू काही

स्वर्गच आला भेटीला


मन हे माझे सुखावले अन्

तुझी आठवण मनी जागली,

याच क्षणी तुला भेटायाची

तीव्र आस माझ्या जीवा लागली


जरी भेटली नाहीस तू तरी

स्वप्नात माझ्या येशील का ?

कोमल तुझ्या त्या हाताला तू

हातात माझ्या देशील का ?


प्रीत माझिया मनातली सखे

तुझिया मनाला कळेल का ?

तुझ्या प्रितीची साथ ही मजला

या जन्मामध्ये मिळेल का ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance