आणि म्हणूनच
आणि म्हणूनच
देवाचा प्रसाद…
मिळेल तेवढाच घ्यावा लागतो
आणखी मागून चालत नाही,
आणि 'फक्त मलाच', असेही नाही
म्हणूनच मी तुझ्या बाबतीत आग्रही नाही
वाऱ्याची झुळूक….
अंगांग सुखावत पसार होते
झाडे-वेली डोलू लागतात
पण, परत फिरून ती आली,
असं होत नाही
म्हणूनच मी तुझी वाट पाहत नाही
ज्याला त्याला आपले आयुष्य आहे
जो तो आपल्याच मार्गाने ते जगत आहे
त्यात घुसखोरी करणे बरे नाही,
मेंदूला हे सगळं समजत आहे
हृदय मात्र सारखं रडत आहे
