आनंदाची उधळण
आनंदाची उधळण
बागेमध्ये पहा किती सुंदर सुंदर फुले
विचारांच्या ह्या पुष्पावरती भावना पहा कशी झूले
लाल पिवळी केशरी गुलाबी आहेत रंगीबेरंगी
सुजलाम सुफलाम देश हा आमुचा अमुचा ध्वज तिरंगी
दिवस रात्र कष्ट करीत राबतो आमचा बळीराजा
साऱ्या जगाचा पोशिंदा हा पण एक तो देव माझा
घेऊ आनंद देऊ आनंद हास्य ठेवूनी चेहऱ्यावरती
स्वानंदाचा उपभोग घेऊया जन्मोजन्मी ह्या धरतीवरती
