STORYMIRROR

Varsha Fatakale warade

Inspirational

4  

Varsha Fatakale warade

Inspirational

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी

1 min
264

आम्ही सावित्रीच्या लेकी

 करतो तिचे गुणगान

कार्य तिचे अनमोल जीवनी

वाढविला राष्ट्राचा बहुमान


शिक्षण आहे महिलांचा हक्क

हे पटवूनी दिले जगास

स्वावलंबी आम्ही आज जाहलो

धार आली व्यक्तिमत्वास


केली प्रगती महिलांनी

आज प्रत्येकच क्षेत्रात 

दान दिले सावूने त्यागाने

शिक्षण दिले आयुष्याच्या पात्रात


अंधश्रद्धा मिटविण्यासाठी

तीचा बहुमोल वाटा होता

विधवा विवाहाचा देखील 

त्या पती-पत्नीने घाट घातला होता


शब्दांची वाहिली स्तुतिसुमने 

तुझ्या कार्यापुढे फिकी आहे

तुझ्या कर्माच्या पुण्याईने आज

महिला सर्व क्षेत्रात सुखी आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational