आला श्रावण
आला श्रावण
आषाढ संपून श्रावण आला
वारा जाऊन पाऊस आला
हिरवाईने नटली धरा
रिमझिम येतो पाऊस बरा
पक्षी गाती पाऊस गाणे
फळाफुलानी नटली धरा
श्रावणात येती नागपंचमी
सासुरवाशीनींची माहेरची भेट होते
बहिण - भावांची पवित्र नाती
रेशीमधाग्यात बांधली जाती
असा हा श्रावण
गोडी वाढवून जातो नात्यांची
