आई
आई
*विषय :- "आई"*
जन्म देऊनी आई
जग हे तू दाखविले
थोर तुझे उपकार
हृदयी तुला पुजिले ||
धरून तुझ्या हाताला
मी शिकले चालायला
डोळ्यात अंजन घालून
सांभाळ आई तू केला ||
लहानाची मोठी केली
जीव अपार लाविला
ठेवून उपाशी स्वतःला
खाऊ घालत होतीस मला ||
जीवनाच्या वाटेवर चालताना
दिलास तू मला आधार
तुझ्यामुळेच आई आज
विद्यार्थ्यांना देते आकार ||
आई तुझे योगदान
आहे माझ्यासाठी देणं
काहीच कळत नाही मला
कसे फेडू तुझे ऋण ||
सुखी ठेव माझ्या आईला
आयुष्य लाभो तिला
हीच माझी प्रार्थना
आई साष्टांग नमन तुला ---
