आई...
आई...
खुशीचा केला पाळणा तिने
हाताचा केला दोर
तिला देवाचे दुसरे रूप म्हणू
की देवाहुन ही थोर
लेकरासाठी कितीही काम केले
तरीपण तू नाही थकतं
विश्व निर्माण करणारा देव ही
आई ची माया नाही देऊ शकतं
दिव्याच्या वाते प्रमाणे जळते
आणि संपूर्ण घर उजळवते
सर्वांच्या सुखासाठी जी त्रास सहन करते
ती आईच असते...
आई या दोन शब्दात संपूर्ण
जगाच प्रेममुरलं आहे
तू शोधून तर बघ...
तिच्या चरणात तिन्ही लोकांचं
सुख दडलं आहे...