भारत देश माझा
भारत देश माझा
जात,धर्म,पंथ जरी
आमचे असले वेगळे
तरी देशाच्या रक्षणासाठी
एकत्र येतात सगळेl
भेदभाव नाही करत
श्रीमंत आणि गरीबाचा
संपूर्ण जगाला देतो
आम्ही संदेश एकतेचा
क्रांतीवीरांनी केले
ब्रिटिशांचे त्रास सहन
थोर वीरांनी केले
जगात देशास महान
त्याग आणि बलिदान
दर्शवितो केसरी रंग
साधू - संतही आहेत
पांढऱ्या वेशात दंग
हिरवळीत राहून देतो
एकात्मतेचा संदेश
तीन रंगात रंगला
सुसंस्कृत माझा भारत देश..
